लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2026 - संपूर्ण माहिती Mahadbt 2.0 वर फॉर्म कसा भरावा
महाराष्ट्र सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2023 रोजी महिला व बाल विकास विभागाने केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मदराला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे आणि बालविवाह सारख्या कुप्रथेला आळा घालणे हा आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र मुलीला जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंत एकूण रु. 1,01,000 ची आर्थिक मदत दिली जाते. आता ही संपूर्ण योजना Mahadbt 2.0 पोर्टलशी जोडली गेली आहे.
अधिकृत वेबसाइट - Mahadbt 2.0
आधी mahadbt.maharashtra.gov.in हे पोर्टल चालत होते, पण आता सरकारने ते बंद करून नवीन पोर्टल सुरू केले आहे.
नवीन अधिकृत वेबसाइट आहे: https://mahadbt2.maharashtra.gov.in
या व्यतिरिक्त योजनेची माहिती तुम्ही `https://womenchild.maharashtra.gov.in` आणि `https://icds.gov.in` वर पण पाहू शकता. कोणत्याही खाजगी वेबसाइटवर फॉर्म भरू नका. खरा फॉर्म आणि पेमेंट स्टेटस फक्त Mahadbt 2.0 वरच दिसेल.
योजनेचे लाभ - 5 हप्त्यांमध्ये पैसे
1. पहिला हप्ता - जन्मावर - रु. 5,000
2. दुसरा हप्ता - इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशावर - रु. 6,000
3. तिसरा हप्ता - इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशावर - रु. 7,000
4. चौथा हप्ता - इयत्ता 11 वी मध्ये प्रवेशावर - रु. 8,000
5. शेवटचा हप्ता - 18 वर्षे पूर्ण झाल्यावर - रु. 75,000
ही सर्व रक्कम थेट आधार-लिंक्ड बँक खात्यात DBT द्वारे जमा होते.
पात्रता काय आहे?
1. मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर झालेला असावा.
2. कुटुंब महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावे.
3. कुटुंबाकडे पिवळे (Yellow) किंवा केशरी (Orange) रेशन कार्ड असावे.
4. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लाखा पेक्षा जास्त नसावे.
5. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना लाभ मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्म दाखला
- आई, वडील आणि मुलीचे आधार कार्ड
- पिवळे / केशरी रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक (आधार लिंक असणे आवश्यक)
- अधिवास प्रमाणपत्र
- शाळेचा बोनाफाईड दाखला
- फोटो
Mahadbt 2.0 वर फॉर्म कसा भरावा
स्टेप 1 - मोबाईलवर `https://mahadbt2.maharashtra.gov.in` उघडा.
स्टेप 2 - MahaID किंवा आधार नंबरने Register / Login करा.
स्टेप 3 - Women and Child Development Department निवडा आणि Lek Ladki Yojana वर क्लिक करा.
स्टेप 4 - आधार e-KYC करा आणि OTP ने पडताळणी करा.
स्टेप 5 - मुलीचे नाव, जन्मतारीख, बँक खाते, IFSC कोड अचूक भरा.
स्टेप 6 - सर्व कागदपत्रे PDF / JPEG मध्ये अपलोड करा.
स्टेप 7 - फॉर्म तपासून Submit करा. तुम्हाला Application ID SMS वर येईल.
जर तुम्हाला ऑनलाइन भरता येत नसेल तर तुम्ही थेट तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन फॉर्म जमा करू शकता. सेविका तुमचा फॉर्म Mahadbt 2.0 पोर्टलवर अपलोड करेल.
फॉर्मचा स्टेटस कसा तपासावा.
फॉर्म जमा केल्यानंतर तुम्ही https://mahadbt2.maharashtra.gov.in वर जाऊन Applicant Login > My Applied Scheme मध्ये तुमच्या फॉर्मचा स्टेटस पाहू शकता. तिथे Under Scrutiny, Approved आणि Fund Disbursed असे स्टेटस दिसेल.
बँक खाते आधारशी लिंक आणि DBT सक्षम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर पैसे अडकतील.
FAQ - अक्सर पूछे जाने वाले सवाल
Q1. लेक लाडकी योजना की आधिकारिक वेबसाइट कौन सी है
Ans. नई आधिकारिक वेबसाइट Mahadbt 2.0 है - https://mahadbt2.maharashtra.gov.in
Q2. क्या फॉर्म ऑफलाइन भर सकते हैं.
Ans. हाँ, आप अपने नजदीकी आंगनवाड़ी केंद्र में जाकर फॉर्म जमा कर सकते हैं.
Q3. 1 लाख से ज्यादा आय वालों को लाभ मिलेगा.
Ans. नहीं, इस योजना का लाभ सिर्फ 1 लाख तक की सालाना आय वाले परिवारों को ही मिलेगा.
Q4. लड़की का जन्म 2022 में हुआ है तो क्या फॉर्म भर सकते हैं.
Ans. नहीं, इस योजना में सिर्फ 1 अप्रैल 2023 के बाद जन्मी लड़कियां ही पात्र हैं।Disclaimer: यह जानकारी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र और Mahadbt 2.0 पोर्टल के आधार पर दी गई है। किसी भी निर्णय से पहले कृपया आधिकारिक वेबसाइट https://mahadbt2.maharashtra.gov.in पर जांच कर लें.


टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें