ST NCMC Card Recharge 2026: आता BHIM App ने सुद्धा रिचार्ज होणार QR स्कॅन करा आणि पे करा
ST NCMC Card Recharge संदर्भात ST महामंडळाचे अधिकृत पत्र - संपूर्ण माहिती 2026
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) डिजिटलायझेशनच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. परिवहन मंत्री आणि ST महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अधिकृत पत्रानुसार, दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून National Common Mobility Card (NCMC) प्रणाली लागू करण्यात आली आहे.
कोणाला कोणते कार्ड मिळणार - अधिकृत पत्रानुसार
1. शालेय आणि तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी: त्यांचे कार्ड 'Saral' नंबरला लिंक असेल.
2. अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवासी: त्यांचे कार्ड आधार कार्डला लिंक असेल.
3. दिव्यांग प्रवासी: त्यांचे कार्ड UDID नंबरसोबत एकत्रित केले जाईल.
NCMC Card ची अधिकृत किंमत आणि Recharge नियम
- नवीन NCMC कार्डची किंमत: 199 रुपये (GST सह)
- जुने कार्ड जमा केल्यावर नवीन कार्ड: 149 रुपयात
- वॉलेटमध्ये किमान बॅलन्स: 100 रुपये
- रिचार्ज हा 50 रुपयांच्या पटीत
Recharge कसा करायचा - आता 5 पर्याय
ST महामंडळाने रिचार्जसाठी आधी 4 पर्याय दिले होते, आता त्यात एक नवीन पर्याय जोडला आहे.
1. ETIM मशीनद्वारे: बसमधील वाहकाकडे असलेल्या मशीन द्वारे.
2. अधिकृत वेबसाईटवरून
3. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे
4. अधिकृत एजंटमार्फत: राज्यभरात 3000+ अधिकृत विक्रेते
5. [नवीन अपडेट - कालचे] आता BHIM App ने सुद्धा रिचार्ज करा - QR Code Scan आणि Pay
ST महामंडळाने काल नवीन परिपत्रक काढून सांगितले आहे की, आता प्रवासी थेट BHIM UPI App द्वारे सुद्धा NCMC कार्ड रिचार्ज करू शकतात.
प्रक्रिया कशी असेल
तुम्हाला तुमच्या NCMC कार्डवर असलेला QR Code स्कॅन करायचा आहे. QR स्कॅन केल्यानंतर तुम्ही BHIM App वरून थेट पेमेंट करू शकता. पैसे भरताच काही सेकंदात तुमच्या कार्ड वॉलेटमध्ये बॅलन्स जमा होईल. यासाठी कोणतेही अतिरिक्त MDR चार्ज लागणार नाही, ही सर्वात मोठी सुविधा आहे.
या सुविधेमुळे प्रवाशांना एजंटकडे जाण्याची किंवा वाहकावर अवलंबून राहण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईलवरून रिचार्ज होणार आहे.
100 रुपयांच्या रिचार्जवर किती पैसे मिळतात
- अधिकृत एजंटकडे 100 रुपयांचा रिचार्ज केल्यावर कार्डमध्ये फक्त 86.14 रुपये जमा होतात.
- ST वाहकाकडे (ETIM) 100 रुपयांचा रिचार्ज केल्यावर कार्डमध्ये 98 रुपये जमा होतात.
- BHIM App ने रिचार्ज केल्यास पूर्ण 100 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे, कारण यात कोणताही एजंट चार्ज नाही.
निष्कर्ष
BHIM App ची सुविधा सुरु झाल्याने NCMC रिचार्जचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
महत्त्वाची सूचना आणि हेल्पलाइन
जर कोणताही विक्रेता तुमच्याकडून 199 रुपयांपेक्षा जास्त पैसे मागत असेल किंवा रिचार्जसाठी जादा चार्ज घेत असेल, तर तुम्ही थेट ST महामंडळाच्या अधिकृत हेल्पलाइनवर तक्रार करू शकता.
तसेच सर्व्हर डाऊनची समस्या असल्यास 30 सप्टेंबर 2026 पर्यंत जुन्या पावतीवर प्रवास करता येणार आहे.
अधिकृत हेल्पलाइन: 1800-22-1250 (MSRTC)
Email: msrtchelpdesk@gmail.com
Disclaimer: ही माहिती ST महामंडळाच्या अधिकृत पत्र आणि परिपत्रकांच्या आधारे दिली आहे. दर आणि नियमांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो, त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर तपासून पहा.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तुमच्या भागात NCMC कार्ड मिळत आहे का. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतर प्रवाशांसोबत Share करा.


टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें