पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 3री यादी 26 सप्टेंबरला 9.44 लाख अपात्र, GR आला
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 - शासन निर्णय (GR) नुसार संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण 0626/प्र.क्र.117/2-स, दिनांक 02.06.2026 आणि 11.06.2026 नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ला मंजुरी दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
ही योजना सुमारे 36,585 कोटी रुपये खर्चाची असून राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.
योजनेचे 3 मुख्य घटक कोणते (GR नुसार)
1. कर्जमुक्ती: 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत असल्यास ती पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
2. एकवेळ समझोता (OTS): 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यास त्यांच्या खात्यात शासनाकडून 2 लाख रुपये जमा केले जाणार आहेत.
3. प्रोत्साहनपर लाभ: सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत नियमानुसार पीक कर्जाची परतफेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
9.44 लाख शेतकरी यादीतून का वगळले?
शासनाच्या माहितीनुसार बँकांकडून कर्जखात्याशी संबंधित माहिती अपूर्ण मिळाल्याने तब्बल 9 लाख 44 हजार 376 शेतकरी पहिल्या लाभार्थी यादीतून वंचित राहिले होते. आता यापैकी सुमारे 6 लाख शेतकऱ्यांची सुधारित माहिती बँकांनी सहकार विभागाकडे सादर केली आहे.
दुसरी यादी जाहीर झाली - 3.55 लाख शेतकरी पात्र
11 सप्टेंबर 2026 रोजी योजनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत राज्यभरातील एकूण 3 लाख 55 हजार 614 पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांना तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
पहिल्या यादीतील 12 लाख 58 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 10 हजार 114 कोटी रुपये जमा झाले आहेत.
3री यादी कधी येणार? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की राज्य सरकार दर 15 दिवसाला पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर करणार आहे.
2री यादी 11 सप्टेंबरला आली असल्याने 3री यादी 26 सप्टेंबर 2026 च्या आसपास जाहीर होणार आहे. ज्या 6 लाख शेतकऱ्यांची माहिती बँकांनी अपडेट केली आहे, त्यांचे नाव 3ऱ्या यादीत येण्याची दाट शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (e-KYC) बाकी आहे, त्यांनी लवकरात लवकर आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन e-KYC पूर्ण करावे.
कोण अपात्र आहे?
महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकरदाते आणि 25 हजारापेक्षा जास्त वेतन घेणारे अधिकारी या योजनेसाठी अपात्र असतील.
यादीत नाव कसे पाहावे?
शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. यादी ग्रामपंचायत आणि बँक शाखेत देखील उपलब्ध असेल.
अस्वीकरण: सदर माहिती विविध वृत्तपत्रे व शासन निर्णयावर आधारित आहे. www.marathithatta.in ही एक माहिती देणारी वेबसाइट आहे. अंतिम व अधिकृत माहितीसाठी मूळ GR व सहकार विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - gr.maharashtra.gov.in
महत्वाच्या लिंक्स:
- GR Download: gr.maharashtra.gov.in
- अधिकृत यादी: mjpsky.maharashtra.gov.in
हे पण वाचा:
- कर्जमाफी दुसरी यादीत नाव कसे पहावे
- e-KYC कसे करावे - संपूर्ण माहिती


टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें